Wednesday, June 24, 2009

सखी

” त्या मेंटलचे केस पाहिलेस पिंजारलेले?"
” ह्या प्रिन्टचा ड्रेस मला खूप आवडतो”
” आपण एवढे बारीक कधी होणार ?”

तृप्ती आणि मी रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या कोणावर्ही कॉमेंट केल्याशिवाय सोडल्याच मला आठवत नाही. तृप्ती, माझी बालमैत्रीण! अगदी पुर्वीची आमची भांडणे, मारामारी केलेलीसुध्हा मला आठवते. अगदी शेजारीच घर असल्यामुळे मिटवामिटवी करायलाही बरं पडाय़चं.


शाळेत पहील्या पाचात यायच्या वगैरे भानगडीत आम्ही कधी पडलो नाही. (पाचात काय पहिल्या पंधरात सुध्हा नाव असण्याची शक्यता कमीच होती ) शाळेत एकत्र जाणाऱ्यांचा ग्रुप मोठा होता. सर्वात सिनियर मुलगी ’प्राचीताई’ आमची लीडर असे. तिच्या बरोबर चालण्याचा मान फ़क्त तिच्या मैत्रिणींना किंवा तिच्याहुन थोडी लहान असणाऱ्या ’मनवा’ ला होता. बाकी आमची वरात मागे निवांत गप्पागोष्टी करत चालत असे. बहुदा मी आणि तृप्ती एकत्र असू. काही समान गोष्टी असणाऱ्या आम्हा सहा मुलींचा छान ग्रुप जमला होता, अजुनही आहे! सिनीयर मुलींची मापे काढणे, नोटबुक अपुर्ण ठेवणे आणि दुसऱ्या ग्रुपच्या मुलींशी काही वैचारीक मतभेद व्यक्त करणे या गोष्टी सोडल्या तर तसा आमचा ग्रुप निरुपद्रवीच होता. आम्ही नेहमी एकत्र असायचो पण तृप्तीशी माझी विशेष मैत्री कधीच कुणाला बोचली नाही. ती सर्वमान्य बाब होती.

’अभ्यास डिस्कस केल्याने ज्यास्त लक्षात राहतो’ या तत्वावर सुरु झालेला ’सामुहिक अभ्यास’ ही एक हास्यास्पद गोष्ट होती. ’ फ़्रेंच राज्यक्रांतीची प्रमुख कारणे भारतीय समस्यांना वळसे घालून स्नेहा कुलकर्णीच्य नविन हेअरस्टाईलपर्यंत कशी पोहचत असत याचा पत्ता लागत नसे. मी आणि तृप्तीने असा अनेक दिवस एकत्र अभ्यास केलेला आहे. तृप्तीच्या घरी गच्चीवर जायचा जिना व अंगण यामध्ये एक छोटीशी खोली आहे जेमतेम तीन लोक बसू शकतील इतकी! बहुदा तिथे आमचा अभ्यास चालयचा. माधुरी दिक्षीतचा नवा पिक्चर, पूजाचा नवा बॉयफ़्रेंड, स्मरणशक्ती वाढवण्याचे उपाय इथपासून पु लंची पुस्तके, अर्थशास्त्र, अध्यात्म इथपर्यंत सगळ्या गोष्टींचा उहापोह होत असे. अधून मधून आमच्या अभ्यासात (?) व्यत्यय आणण्याचा प्रयत्न तृप्तीचा लहान भाऊ इमानऎतबारे करीत असे. मग ती त्याच्या अंगावर खेकसत असे. पण नंतर एकंदरीत आमच्या अभ्यासाचा अंदाज आणि संशय घरच्या लोकांना येवू लागला आणि त्याचे पुरावेही वर्षीक टक्केवारीत दिसू लागले त्यामुळे पुढे हे प्रकरण कमी झाले.

सकाळी लवकर उठून फ़िरायला जायचे आणि आमच्या आळशीपणाबद्दल उगाच वावड्या उठवणाऱ्य़ा मंडळींची तोंडं बंद करायची असा निर्धार आम्ही अनेक वर्षं केला होता.
तृप्ती- ”ए, उद्या नक्की उठ हं, ५.३० ला बाहेर पडू."


”५.३०??? (येवढ्या मध्यरात्री?) नको..”

” बरं, मग ६.००? "

" अं...."

" ठिक आहे. dot ६.३० ला हाक मारते. OK? "

" अगं, कुत्री मागे लागतात!"

" मग ती ६.३० लाच मागे लागतात का?"

" Ok. Ok.."

अशा संवादानंतर पावणेसात या आडमुठ्या वेळेवर मांडवली व्हायची. पहीले ६-७ दिवस खरच जायचोही! पण नंतर घोड कुठे अडायच देव जाणे..! पण घरच्यांच्या टिंगल टवाळीला अजिबात दाद न देता सलग चार पाच वर्षे असे कार्यक्रम आम्ही चालूच ठेवले.
कोल्हापूरमधे महलक्ष्मी मंदिरात बसण्याची आमची एक खास जागा आहे. जरा बाजूला असणाऱ्या मारुती मंदिरच्या पायऱ्यांवर आमची सल्लामसलत चालत असे. त्या मारुतीला आत्तापर्यन्त काय काय म्हणून ऎकावे लागले असेल, तोच जाणे..! छोटे कच्चे आवळे, चिंचांचा समाचार घेत गुप्त खलबतेही चालत असत. आजही मंदिरात त्याच पायऱ्यांवर दुसरे कोणीतरी गप्पा ठोकत बसलेले दिसले, की आपल्या मालकीची जागा त्याला दिल्यासरखे वाटते.
आज लग्न होउन ती छान गृहकृत्यदक्ष वगैरे गृहिणी बनली आहे. पण हस्ताचा पाऊस, शाळा सुटल्यावर गर्दीने भरलेला रस्ता हट्कून मन मागे नेतो. खरचं, शाळेतल्या वर्षांनी माझा मैत्रीचा कोपरा खऱ्या अर्थाने समृध्द केला.

19 comments:

Atul Mungale said...

823Ekach no. yar...Chan lihile aahes...
Tu and Trupti doghi dolyasamor aalya he vachun..!! Keep writting
All the best...!! - Atul

Meenal's said...

Thanks atul..

Satish said...

Tu itka chhan lihu shaktes, really admirable, I only wish I had been there in ur group. By the way, dear, Gajali is our malvani word!

Meenal said...

धन्यवाद,
हो,गजाली हा मालवणी शब्द आहे.याचा अर्थ शिळोप्याच्या गप्पा..!

Citius.Altius.Fortius said...

Nice entry, I could relate to all of those things in school... only that there was guys talk instead of girl talk in my mind...
Keep posting...

Manasi said...

hi mast vatale "aapalya" shalechya divasanbaddal kunitari lihalel vachun. ani aapale divas pan chhan hote g mine...! kharach ani malahi aathavala aapala bench,varga,dhade ani baryach goshti janchi ek yadich hoil. Lihit raha chhan lihates.

ketaki said...

meenal...sagle scenes agdi jaseche tase dolyansamor ubhe rahile g.... agdi hech ani asech sagle maze shaleche diwas hote :-) fakt truptichya jagi manjiri hoti :-) uttam lihites...atyant koutukaspad kam kele ahes..
ashich lihit raha ...

Meenal said...

Balkrishna, manasi, ketaki..
thank u so much for ur appreciation. :)

Aparna said...

chhan lihilayas g.. malahi maze shaleche diwas aathawle.
maitrininbaobar keleli danga-masti,rusawe-fugawe saglach ekdam dolyasamor taralun gel.
keep posting.. :)

Meenal said...

अपर्णा, शाळेतले दिवस खरचं अगदी मोरपिसासारखे असतात..तुलाही आठवली ना, ती गम्मत ?

Ajay Sonawane said...

khupach chan, khup khup aavdali post, keep writing !
-Ajay

आर्यन केळकर said...

लहानपणी किती छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा सिक्रेट्स असायच्या. आठवलम तरी हसायला येते. पण खुप सुंदर होते ते दिवस.
सोनाली केळकर

मीनल said...

पहिल्या पोस्टला इतक्या दिवसांनीही कमेंट मिळालेली पाहून खूप आनंद झाला..
धन्यवाद सोनाली..

THE PROPHET said...

आय डोन्ट नो,
मी फिरत फिरत तुझ्या ह्या पोस्टवर ऑफिसातूनच पोचलो...तिथे वाचली आणि इतक्या जुन्या पोस्टवर कशाला कॉमेंटायचं म्हणून आवरलं..
पण घरी आलो आणि राहावलं नाही...
मी माझ्या लहानपणच्या मित्रांबरोबर क्षणभरासाठी खेळून आलो! डॅम, सुचत नाहीये काही!
खूपच छान लिहिलंयस!
सॉरी इतकी जुनी पोस्ट उकरून काढल्याबद्दल! :)

मीनल said...

जुन्या पोस्टवर कशाला कॉमेंटायचं ??
प्रचंड छान वाटतं, जुनी पोस्ट उकरली जाते तेव्हा..
पहिल्या पोस्ट जास्त बालिश असतात खर्‍या, पण त्या ज्या इंटेन्सिटीने लिहल्या जातात, त्याची सर शिंगे फुटलेल्या पोस्टला नाहीच येत!
खूखूआ, उकराउकरीबद्दल..!

Anonymous said...

हे हे किती गोड आठवणी ना :)
खूप छान लिहलयस..आवडली पोस्ट..विभिला थॅंक्स ही पोस्ट उरककली म्हणून :)

संकेत आपटे said...

छान आहे लेख. आवडला. :-)

मीनल said...

सुहास,
तुलाही थॅंक्स रे, पहिल्या नोंदीच्या प्रतिक्रिया खूप मोलाच्या असतात बाबा!

मीनल said...

धन्यवाद संकेत,
आपले आभार आणि स्वागत.