Monday, June 29, 2009

गीतांजली

खरं तर एवढं सुंदर नाव असणाऱ्या नोबेल मिळलेल्या या पुस्तकात आहे तरी काय, या उत्सुकतेपोटीच शाळेत असताना मी गीतांजली वाचुन काढलं. आणि पहिल्यांदा फ़ारस काही कळाल नाही. त्यातही इंग्लिश भाषांतरात thy, thou, thee अशी भाषा वापरलेली..

खर म्हंजे कविता हा माझा प्रांत नव्हे.. शाळेत ’खालील कवितेचे संदर्भासहित स्पष्टीकरण द्या’ य घोकुन पाठ केलेल्या उत्तराने मला बरेच तंगवले होते. त्यात माझी मैत्रिण अपर्णा हिने केलेल्या ’मुक्तछंद’ प्रकारात मोडणाऱ्य़ा कविता वाचुन माझा कवितेवरचा विश्वास उडाला होता. ’कवटी’ , ’ चिखल’ , ’किडे’ , ’प्राणाघात’, अशा शब्दांची खरचं भिती वाटत असे. तिला काही समजवण्याचा प्रयत्नही व्यर्थ गेला होता.

” अगं, पण तू चांगले आणि यमक शब्द का वापरत नाहीस? ”

” मुक्तछंदाची कविता अशीच असते ”

माझ्या अज्ञानाकडे तुच्छतेने पहात ती म्हणाली होती..असो..

गीतांजलीच्या कविता आधी मला स्वप्निल वाटायच्या. पण मुखवटे आणि चेहऱ्य़ांचा, खऱ्या आणि खोट्याचा थोडाफ़ार अनुभव घेतल्यावर या कवितांमधला प्रकाश दिसू लागला. नवे अर्थ कळु लागले, संदर्भ लागत गेले. या छोट्या छोट्य कविता खूप तरल आणि सुंदर आहेत, काही दुर्बोधही आहेत.
वेगवेगळ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा प्रत्येक कवितेत दिसतात. जसा हा काळसर करडा रंग :-

'If thou showest me not thy face, if thou leavest me aside

I know not how I am to pass these long , rainy hours..

I keep gazing on the far away gloom of sky,

and my heart wonders wailing with the restless wind..'

किंवा हा आशेचा कोवळा केशरी रंग :-

'I surly know that hundread petals of the lotus will not remain closed

and the secreat of honey in it will be bared..'


रविन्द्रनाथांचे आयुष्यही असेच परस्पर विरोधाने भरलेले होते. ते स्वत: जरी बालविवाह विरोधी संस्थेत होते, तरी त्यांनी मुलीचा विवाह बाराव्या वर्षीच केला.
गीतांजलीतील कविता ठरवून वगैरे लिहल्या गेल्या नाहीत. तो उत्फ़ूर्त प्रतिभेचा आविष्कार होता. या काळात गुरुदेवांनी दिक्षा घेतली होती. त्यांचे मन शांती आणि परमेश्वर याच विचारांनी भारलेले होते. योगानंदांच्या विचारांचा बराच प्रभाव होता. आणि या सगळ्यांविषयी वाटणारी कृतज्ञता त्यांनी इतक्या सुंदररीतीने व्यक्त केली.
गीतांच्या मध्यमातून त्यांनी संपूर्ण भावाने अंतरीतून परमेश्वराला जी हाक मारली, ज्याचा मंजूळ नाद आजही किणकिणत आहे.

’I have spread my mat on the floor, & whenever thy pleasere my Lord,

come silently and take thy seat here..!'

6 comments:

anjali said...

मीनल,
आज मी खुप आनंदात आहे कारण आज मला कुणीतरी माझ्यासारखीच भेटली...'गीतांजली-वेडी'..
तुझ्यासारखीच मलाही कविता या प्रकाराची अजिबात गोडी नव्हती.पण एक दिवस अचानक 'गीतांजली'हातात पडलं आणि माझी आयुष्याकडे पहाण्याची दृष्टीच बदलून गेली.रविंद्रनाथ नुसते कवि नव्ह्ते तर थोर तत्ववेत्ते होते असंच त्यांच्या या कविता वाचतांना जाणवतं..मला आवडलेली एक कविता आणि मी केलेला त्याचा भावानुवाद इथे देतेय,बघ तुला कसा वाटतोय्...

Patience

If thou speakest not I will fill my heart with thy silence and endure it.
तु ज्ररी माझ्याशी बोलला नाहीस,तरी तुझ्या मौनाने मी माझं अंतःकरण भरुन घेईन आणि ते जपून ठेवेन जीवापाड ...

I will keep still and wait like the night with starry vigil

and its head bent low with patience.

मीही तुझी प्रतिक्षा करेन , शांत,निश्चल मनाने ...क्षितिजावर झुकलेल्या चमचमणार्या नभाप्रमाणे ......

The morning will surely come, the darkness will vanish,

and thy voice pour down in golden streams breaking through the sky.

निशा संपून पहाट होईल...आणि निळ्या नभांतून आलेल्या ,तुझ्या सोनेरी स्वरांनी मी न्हाऊन निघेन...


Then thy words will take wing in songs from every one of my birds' nests,

and thy melodies will break forth in flowers in all my forest groves.
तुझ्या शब्दांना पंख लाभतील घरट्यातल्या पाखरांचे..अन् तुझी सुरेल सुरावट उमलून येईल या रानफुलांच्या गंधातून्....

*******************************

Satish said...

I liked your begining, I am a fan of Robi Thakur though I hv yet to read Gitanjali, but if my Tukaram or Gyanaba had this opportunity to express in english, their each Abhanga or Ovi or Virani wud hv Nobels showered.

Meenal said...

अंजली,
तुझी प्रतिक्रिया वाचुन खूप आनंद झाला. तू खूप छान आणि सहज भावानुवाद केला आहेस..
आणखी कवितांचाही केला आहेस का? मला meenal.blog@gmail.com वर पाठवशील का?
गीतांजलीने कशी,कुठे साथ दिली आहे हे शब्दात सांगता येणार नाही.Its really gr8..

Thank u so much Satish kaka.appreciation gives much more strength for further road.

Pradeep Vaiddya said...

टागोर महान होते ! त्यांची दोन नाटके मी रूपांतरित केली आहेत .. एकाच माणसामध्ये इतक्या सर्व कलागुणांचं अपूर्व मिश्रण क्वचितच पाहायला मिळू शकतं ...

anyway .. thanks for your comment on my post .. I will read your blog ... लेकिन फुरसतसे ...

Somesh Bartakke said...

गुरूदेवांच्या कवितांचा मराठी अनुवाद श्री. म्हैशाळकरांनी केलाय, भन्नाट कविता आहेत. :)

Meenal said...

प्रदीप,सोमेश धन्यवाद.
त्यांच लिखाण अनुवादित स्वरुपातही इतक सुंदर वाटतं..श्री. म्हैशाळकरांनी केलेला मराठी अनुवाद वाचणे नक्कीच आनंददायक असेल.