Tuesday, July 7, 2009

आमची (न घडलेली) संगीतसेवा..!

'' तुला माहित नाही पण क्लास मधे मी एकदा का मेंडोलीयन वाजवू लागलो ना, की सगळे नुसते ऎकत राहतात..!"

माझा मोठा भाऊ राहुल एखादे गुपित सांगावे तसे खाजगित सांगत असल्याचे मला आठवते . पुढे पुढे क्लास मधले ’ते सगळे’ नुसते हतबल होऊन ऎकत असतात हे माझ्या लक्षात आले. साधारण १९९५-९६ च्या सुमारास DDLJ रिलीज झाला तेव्हा माझ्या दादाने inspire होऊन मेंडोलीयन शिकण्याचा मनापासून प्रयत्न केला होता पण त्या शिकण्यात learning कमी आणि shining ज्यास्त असल्याने ते वाद्य त्याला फारसे प्रसन्न झाले नाही. पण कॉलेजमधल्या मैत्रिणींवर impression मारण्यासाठी मात्र मेंडोलीयनने त्याला बराच हात दिला असावा. ’ तुझे देखा तो ये जाना सनम ’ हे गाणे शिकण्यासाठीच त्याने क्लास लावला, नविन मेंडोलीयन खरेदी केले आणि प्रक्टिस करुन करुन घरच्यांचे डोके उठवले ! हे गाणे मात्र तो अगदी सुरात सलग आणि स्पीडीली वाजवत असे.

"एवढे सोपे नसते, स्पीडी वाजवणे.."

असे म्हणून त्याच्या बोटांना पडलेले घट्टे तो दाखवायचा.. मी त्याच्या ज्ञानाने आणि कष्टाळूपणाने दिपून जात असे! त्याने मेंडोलीयनवर 'R' अक्षर काढुन चमचमती स्टिकर्स लावून खूप छान सजवले होते. रोज मऊ कापडाने तो मेंडोलीयन पुसून ठेवायचा. पुढे ’ है अपना दिल ’ वर थोडी खटपट करुन त्याने त्या मेंडोलीयनला जी विश्रांती दिली, ती आजतागायत मोडलेली नाही. तसा तो अगदी लहान असताना तबलाही शिकायला जायचा पण त्याने तबला शिकणे हे त्याचे शिक्षक तो आणि तबला या तिघांनाही मंजूर नव्ह्ते.

माझ्या दादाला बऱ्याच गोष्टी करता येतात, तो ऒलराउंडर आहे अशी माझी पक्की समजूत होती. त्यामुळे त्याचे अनुकरण करणे आलेच! मीही नंतरची काही वर्षे मेंडोलीयनवर हात साफ़ करुन घेतला. त्याचे ते टिपीकल ’तुझे देखा तो’ आणि ’है अपना दिल’ त्याने उदारपणे मला शिकवले (त्यावेळी तो फ़र्स्ट इयरला होता आणि आपण खूप अभ्यास करतो हे दाखवण्यासाठी झिरो नंबरचा चष्मा घालायचा )
पुढे कॉलेजमधे गेल्यावर आपणही वेगळे वाद्य शिकावे असे वाटू लागल्याने मी व्हायोलीनचा क्लास लावला. (हो, त्यावेळी मोहब्बते नविन होता ) बेसिक नोटेशन्स आणि भूप राग या नंतर माझा पेशन्स संपला (आमचे सर गाणी शिकवत नाहीत हे मला नंतर कळाले) तोपर्यंत घाईगडबडीने नविन व्हायोलीन ख्ररेदी केले होते, म्हणून मग घरीच गाणी बसवण्याचा प्रयत्न केला(तो फ़सला हे सांगायला नकोच! ) व्हायोलीन हे असे वाद्य आहे, की जे सुरात वाजवले तरच मधूर वाटते.
आता खंत वाटते हे सुंदर वाद्य नेटाने आणि चिकाटीने शिकायला हवे होते ! माझी संगीतामधली जाण आणि घरच्यांचे मानसिक स्वास्थ यांचा विचार करुन मीही दादाचा मार्ग स्विकारला आणि व्हायोलीनला विश्रांती दिली... पण कॅसिओ, बासरी, माउथ ओर्गन या वाद्यांवर प्रयोग चालूच ठेवले. आजही माउथ ओर्गन वर हे गाणे ओळख अशी धमकी दिल्याने आई घाबरुन जात असल्याचे माझ्या लक्षात आले आहे असो..

दादाचं मेंडोलीयन ’ तुझे देखा तो ’ वाजवुन वाजवुन धन्य झालं आणि माझं व्हायोलीन काहीच न करता त्याच्या शेजारी जाउन बसलं. हे सगळं चर्‍हाट सांगायचा मुद्दा हा, की परवाच गुळवणी सरांचे फ़ार सुंदर लाइव्ह सतार वादन ऎकले. मला सतार शिकायची आहे.
कोणी ओळखीचे शिक्षक आहेत का ?

15 comments:

Manoj said...

ha ha..!
Mihi Gitar shikayacha barach prayatna kela.pan navyache nau diwas zalyawar sodun dile

Rahul........ said...

Junya divasanchi aathavan zali.
Mast divas hote te. Golden days.
chhan lihil aahes. sagal eakdum dolyasamor chitrasarakh ubh rahil.

Meenal said...

Thanks Manoj..
Rahul dada, yes, those were golden days.. :)

sanika said...

dhanya te bahin-bhau jyani hi sangitseva karnyacha prayatna kela ,ani dhanya ti mata pitare jyana (nailajan ka hoina pan) hi sangitseva sahan karavi lagli.........but to be frank concentrate on writting rather than......(satar pls nt again)

Anonymous said...

राहुल दादा का क्या केहना! खुप छान, इतकं छान, कि "किती छुंदड" असं म्हणावं वाटत अाहे!

Meenal said...

सानिका,
मलाही असेच वाटते पूर्ण शिकायचे असेल तरचं सतार हाती घ्यावी.

अतुल दादा,
धन्यवाद. तुमच्या कौतुकाने उत्साह वाटतो. :)

Somesh Bartakke said...

मीनल,

माझ्या mind map मधे शास्त्रीय संगित शिकणे, बासरी शिकणे, हार्मोनिका[माऊथआरगन] शिकणे या गोष्टी आहेत .. बघू कधी योग येतो ते ...

Meenal said...

सोमेश, योग नक्की जुळवून आणा. नुसती खटपट केली तरी संगित इतका आनंद देते तर पूर्ण शिकल्यावर किती समाधान वाटत असेल!

Citius.Altius.Fortius said...

दादाने वाचलं आहे का हे?

Somesh Bartakke said...

मीनल,
'तुमच्या ' कमेंट वाचून मला 'वयोवृद्ध' झाल्यासारखं वाटलं .. :) , मी एक लहान मुलगा आहे .. :)

Meenal said...

बाळ्कृष्ण, हो दादाने वाचले आहे,त्याने कमेंटही दिली आहे.. :):)
सोमेश, तुमच्या कमेंटचा अर्थ नीट कळाला नाही,
पण ’तू’ लहान असण्याशी संबंधीत आहे का? :):)

Anonymous said...

It is 'chaRhaaT', not 'charhaaT' .
It is 'Bhoopali' or Raag 'Bhoop', not 'Bhup'.

Pravin said...

मस्तच. मलाही काही वाजवता येत नाही. कोणी विचारल तर सांगायचो की टाळ्या वाजवता येतात म्हणून. मग कुठल्यातरी एका इंग्रजी सिनेमात लयबद्द टाळ्या आणि तितक्याच लयबद्दतेने केलेला टॅप डॅन्स बघून ते ही सांगायचे सोडून दिले :)

मीनल said...

अनामिक, चर्‍हाट भूपची दुरुस्ती केली. ठांकू..:)
प्रविण, हि हि..प्रतिक्रीयेबद्दल लयबद्ध टाळ्या.. :) :)

संकेत आपटे said...

हीहीही.... मीही लहानपणी तबल्याचा क्लास लावला होता. पण दोन आठवड्यांतच तबल्यावर होणारे अन्याय सहन न झाल्याने सोडून दिला...