Thursday, December 24, 2009

पुढचा टॅग..

ही योगायोगाची साखळी खरचं मजेशीर आहे. तीन दिवसांपूर्वी कपाट आवरताना स्लॅमबुक मिळाली. परत वाचून काढली. विशेषत: 'opinion about me' ची वाक्ये. खाल्ल्या वडापावला जागून झाडून सगळ्यांनी चांगल्याच ओळी खरडल्या आहेत, पण बरं वाटत परत वाचताना.

श्रेयसीने लिहलेली सुंदर अक्षरातली पाने मात्र मनापासून लिहलेली आणि कवितेत भिजलेली! इतकी हळवी मुलगी मी कधीच पाहिली नाही. दुसर्‍या दिवशी ’काय गं, कशी आहेस’ असा फ़ोन आणि कधी भेटायच हा प्रश्न! मग त्यावरं आपण टेलीपथी असण्याबद्द्ल शेरा वगैरे.. आणि आज अजय चा टॅग केले असल्याचा ’बेधुंद’ मार्फ़त निरोप. मजाच आहे.

1.Where is your cell phone?

त्याच्या नविन पाऊचमधे

2.Your hair?

वाढायच्या विचारात दिसतात

3.Your mother?

सर्वात जवळची

4.Your father?

Brillient & Balanced

5.Your favorite food?

शाका.चमचमीत काहीही

6.Your dream last night?

रुट्स पुस्तकातला कुंटा आला होता स्वप्नात

7.Your favorite drink?

चहा

8.Your dream/goal?

World Tour yuppi..!

9.What room are you in?

स्टडी रूम
(एक मुलगी, बायको, आई, आजी वगैरे होत जाते तशी ही खोली renovation नंतर हॉल, गेस्टरुम, भावाची खोली, स्टडी रूम इ.स्थितंतरातून गेलेली आहे.तिसरा बदल तिच्यासाठी ज्यास्त कष्टप्रद असावा.)

10.Your hobby?

वाचन

11.Your fear?

पाल

12.Where do you want to be in 6 years?

ते... २०१२ चं काय झालं?

13.Where were you last night?

घरी

14.Something that you aren’t diplomatic?

नात्यातल्या, मैत्रीतल्या बर्‍याच काळजीवाहू व्यक्ती

15.Muffins?

चॉकलेट फ़्लेवरच अस्तित्व असलं म्हणजे झालं!

(इथे चॉकलेट्वाल्या व्यक्ती बर्‍याच दिसल्या)

16.Wish list item?

ते कधी संपतात का?

17.Where did you grow up?

कोल्हापूर

18.Last thing you did?

जी च्या ब्लॉग पर्यंत वाट काढली.

19.What are you wearing?

(ढगळ)कुर्ता व जीन्स

20.Your TV?

चॅनलप्रमाणे फ़िरत असतो सारखा, डिस्नेवर बरेचदा स्थिरावतो.

21.Your pets?

नाही

22.Friends

चांगले आहेत सगळे!

23.Your life?

मस्त चाललय.(लाकडाला स्पर्श)

24.Your mood?

झकास!

25.Missing someone?

हो ( विचारलं नाही म्हणून नाव सांगत नाही :-) )

अजयच वाक्य कॉपी केलयं फ़क्त ’णू’ दुसरा काढलाय.

26.Vehicle?

चित्रातली की चालवता ती?

27.Something you’re not wearing?

Tension

28.Your favorite store?

Ikea

Your favorite color?

खाकी सोडून सगळे

29.When was the last time you laughed?

काल

30.Last time you cried?

आठवत नाही

31.Your best friend?

http://gazali.blogspot.com/2009/06/blog-post.html

32.One place that you go to over and over?

नाईलाजाने- शिंपी (चारातले तीन ड्रेस बिघडवायचेचं असा अलिखित नियम असावा)
आनंदाने- लायब्ररी

33.One person who emails me regularly?

मॉन्स्टर जॉबवाले

34.Favorite place to eat?

प्रत्येक पदार्थासाठी वेगवेगळी आहेत.

मी सोमेश, मुग्धा, बहिर्जी नाईक, हरेकृष्णजी, योग, प्रविण  यांना टॅग करते आहे.

16 comments:

Ajay Sonawane said...

"रुट्स पुस्तकातला कुंटा आला होता स्वप्नात" हे काय प्रकरण आहे ? मला नाही समजल, रुट्स पुस्तक वाचावं लागेन आता मला.
खुप हसत होतो टॅग वाचताना तुझा. म्हणून ( 'णू' दुसरा अगदी आठवणीने, टोमणे कळतात बरं आम्हाला :-) ) प्रतिक्रिया दिली.

अग तुझ्या पाठीमागे काय आहे, पालीसारखं काहीतरी वळवळतय. पाल तर नाही ना ....

-अजय

मीनल said...

अगदी खिळवून ठेवणारे ऎलेक्स हॅलेचे हे पुस्तक दुसर्‍यांदा वाचते आहे.१८व्या शतकातल्या निग्रो गुलाम क्रांतीवर आहे.
तुझ्या नविन पोस्टमधे हातुन,तिथुन,मिळवुन चे उकार दुसरे आहेत. :)
ई.. पाली सारखाच ’वळवळत’ हा शब्दसुध्दा कसातरीच आहे.

Ajay Sonawane said...

मला शुद्धलेखनावर भर दिला पाहिजे असं वाटायला लागलंय. म्यॅडम ( मुद्दामच म्यॅडम असं बोलतोय ) शिकवणी घ्याल का ? :-)

-अजय

Gouri said...

majaa yete aahe tag cha pravaas baghataana ...
roots he khoopach sundar pustak aahe ... tyaachi aathavan karun dilit, dhanyavaad!

मीनल said...

नक्कीच! शुद्धलेखनावर भर दिलेला केव्हाही चांगला.
पण शिकवणी घेण्याइतक मलाही येत नाही.

मीनल said...

गौरी, मराठी ब्लॉगविश्व वर तू सुरु केलेली टॅगची गंमत वेगळीच आहे.
रुट्स तुलाही आवडल नां?

अपर्णा said...

मीनल मस्त लिहलंस..सक्काळी लवकर जाग आल्याचा फ़ायदा...पोरगं झोपलं असताना निवांत वाचुन आणि प्रतिक्रियापण देते....अगं आयकियाला कशी मी विसरले यार....बघ तू स्टडीरूममध्ये आहेस ना त्याचा फ़ायदा...
आणि ते ’णू’ दुसरा लै झ्याक...अजय मी एक शुद्धलेखनावरची पोस्ट लिहायचा प्रयत्न केला होता...बघ काही मदत मिळते का....

विक्रम एक शांत वादळ said...

'टॅग' नक्की काय प्रकार आहे समजेल का नवीन माणसाला ?

मीनल said...

Thank u Aparna,
टॅग मधले बरेचसे पॉईंट डिट्टो आहेत..
तुझं आयकिया राहिल तसं माझं हरी कुंभार आणि मोकाट कुत्रे/मांजरी नमूद करायच राहिल! :)

मीनल said...

विक्रम, टॅग म्हणजे वरच्या ३४ प्रश्नांची एका शब्दात (आता त्याच रितसर एका वाक्यात झाल आहे)उत्तरे द्यायची. तु तुझ्या ब्लॉगर मित्र मैत्रिणींना पुन्हा टॅग करु शकतोस. अपर्णा, गौरीचे ब्लॉग वाचून तुझ्या लगेच लक्षात येईल. मी तुला टॅग केले आहे.

विक्रम एक शांत वादळ said...

धन्यवाद माहितीबद्दल

बाकी मीही टॅगा - टॅगी केली बर का

yog said...

beautifully written.. ultimate!
so many references take us at various feelings!

thanks very much for giving me a chance to tag..
i will tag myself later on, but not now..
cause i have no so much time

thanks once again

मीनल said...

Thanks Yog,
will wait for ur tag post.

Anonymous said...

हि गोष्ट लक्ष्यात राहील. तू मला Tag केलं नाहीस.

मीनल said...

oh.. so sorry....
तुला Tag केले आहे.
तू सह्याद्रीवर सहा महिने हात फ़िरवला नाहीस.
waiting for ur Tag

Anonymous said...

डन-डना-डन-डन!