Wednesday, March 17, 2010

प्रगती

"हॅलो, कोण मंगळाचार्य आहेत का? हो, मी अर्थ सेक्टर मधूनच बोलतोय. आम्ही दिड वर्षांपूर्वी आपली अपॉईंमेंट घेतली होती. नाही कसे म्हणता? आपल्याला पाठवलेल्या सॅटेलाईट संदेशाचा बॅकअप आहे आमच्याकडे! सरकारी कामाचा अनुभव आपल्या पूर्वजांनी सुध्दा पुराणात लिहून ठेवला आहे. त्यावरुन सगळे संदेश ई फाईल्स मध्ये आहेत आमच्याकडे. ठीक आहे. उद्या परत बॅकअप सिग्नल्ससकट संपर्क साधतो. हॅलो, हॅलो.. काय कटकट आहे, जवळच सिग्नल पॉईंट असूनही संपर्क होत नाही. अहो उंगिरे, जरा ती फाईल डिस्प्ले करा.. "

" साहेब, ती फाईल गेली कधीच! "

" काय? कशी? "

" अहो आपल्या अँटी लायरसलाच लायरस लागला. त्याची वाजली घंटी! "

" बट व्हाय? "

" अँटी करप्शनला बॅकअप डाटा सिस्टिममधे ’रस’ निर्माण झाला. ट्रबलशूटच्या वेळी तुम्हाला विचारल होतं, ती फाईल पण क्लीन करायची आहे का म्हणून तेव्हा तुम्हीच सांगितलेत की बिनसोईच्या फाईल्स उडवा. "

" उंगिरे, मातृभाषेत बोला.. काय त्या दहा तोंडी बोलणार्‍या देशाचे शब्द घुसडताय? आणि उडवा काय? ’गहाळ’ शब्दाचा अर्थ कळतो की नाही? नविन लायरस तयार करा. त्याचे डिटेल्स घंटी लायरस कंपनीला पाठवा आणि त्यामुळे फाईल करप्ट झाल्याचे दाखवा. उद्या बघतो, मंगळ्वाल्यांना काय उत्तर द्यायचे ते.. काही झालं तरी इथल्याच मातीचे आहेत ते. "

" नविन लायरसचा खर्च दाखवायचा कुठे? "

" उंगिरे, प्रत्येक गोष्ट मीच सांगायला हवी का? जाता जाता ऑक्सिजन सिस्टीममधली ट्यूब फोडा आणि मेंटेनन्स खर्चामध्ये ’तो’ खर्च घुसडा. काय? "

" पण साहेब, ऑक्सिजन सिस्टिम बंद पडली तर आपण बाहेर कसे पडणार? "

" तुमची सेवासमाप्ती कधी आहे? "

" नाही, कळलं, मि फक्त कॅंटिनमधली ट्यूब निकामी करतो "

" हं, ठीक आहे. यावरुन आठवलं, माझ्या मुलांना शाळेचा ’हिस्ट्री प्रोजेक्ट’ पूर्ण करायचा आहे. पूर्वी झाडांमधून वगैरे ऑक्सिजन मिळण्याची सोय होती, तर ही दाट म्हणतात तशी झाडी मिळवा. ब्लॅक मनी द्यावा लागला तरी चालेल पण माझ्या मुलांचा सर्वात चांगला प्रोजेक्ट झाला पाहिजे. ते चित्रातून जंगल दाखवण बास झालं! "

ठीक आहे. आपल्या सरकारवेदांत सुध्दा पाचव्या खंडात वनखात्याचा उल्लेख आहे. ति माहितीही फर्नांडीसला तयार ठेवायला सांगतो. "

" ठीक. त्या चिमण्यांसारखे नामशेष पक्षी झाडावर बसायचे म्हणजे काय ते मुलांना समजवा. नाहीतर आयत्या वेळी गडबडायचे ते! सिग्नल ट्रॅफिक समस्येचं उत्तर तयार केलंत का तुम्ही? "

" तसं वरवरं केलय पण, बिम फोनचे सिग्नल्स, रिसिव्हींग, ट्रांस्मिटींग पॉईंट्स खरचं इतके वाढलेत की, त्याने मशिनिय प्रकृतीवर वाईट परिणाम होतो आहे. परवा तर मोनिया मॅडमच्या रोबोटने चक्क मिटींगला बसायचे सोडून गुरुद्वाराची वाट धरली. ’ प्रत्येक कंपनीला रोटेशनने दिवसाचा ठराविक काळ देण्यात येईल ’ हा मार्ग कुणाला पटेल असे वाटत नाही. बड्या बड्या कंपनीने भांडवल गुंतवले आहे त्यामुळे स्काय मिटींगमध्ये दंगा होण्याची शक्याता आहे. कायामती तर मिटींगत्याग करतील "

" उंगिरे, भारतात ९५% जागा आरक्षणासाठी आणि ५% खुल्या, निव्वळ गुणवत्तेसाठी आहेत. तुम्ही ५% मधून आलात हे खरचं वाटत नाही. तुम्ही माझे पी.ए., पण कित्येक गोष्टी बोट वाकडं करुनच कराव्या लागतात हे तुम्हाला कधी कळणारं ? मीही एका मंत्र्याचा पी.ए.च आहे. पण त्यांना मला काही सांगावेसुध्दा लागत नाही. असं बघा, सभेत दंगा होईल, वातावरण नियंत्रित करणारे मशिन चालू होईल, मनःशांतीचे संगित लावले जाईल आणि सगळे रिलॅक्स होईपर्यंत सभा पुढे ढकलल्याची घोषणा होईल. आणि काय हवे आहे? मधे कुठेतरी आपण किती क्षेत्रात प्रगती केली आहे हे नमूद करायला विसरु नका.."

" बरं, दुसरा महत्वाचा मुद्दा पाजीस्तान बाबतचा आहे. परराष्ट्र खात्याने सलोख्याचे संबंध निर्माण होण्यास वाव असल्याचा अहवाल दिला आहे. संपूर्ण देशात २ ठिकाणी आतंक, ५ ठिकाणी फोझन फूड मधून घातक द्रव्ये, प्रक्षोभक प्रचाराने जातिय फूट या सगळ्यांचे धागेदोरे पाजीस्तानापर्यंत पोहोचतात. जागतिक शांततेसाठी ही अतिगुप्त (?) माहिती सादर करायची की सलोख्याचा रिपोर्ट पुढे ढकलायचा? "

" हं.. तूर्तास तो विषय प्रलंबित ठेवू. तसाही त्या देशात दम उरला नाहीये. च्यामारीका त्यांच्यावर दबाव आणेल असा अंदाज आहे. गुप्त मदत पोचवून त्यांच तरी काय भलं झालं? चला, लवकर कँटीनच्या ऑक्सिजन ट्यूबची (अ)व्यवस्था करा. चला, कामाला लागा.."

शेकडो वर्षांपासून प्रलंबित विषय आणखी किती लांबवायचा याचा विचार करत उंगिरेंनी वातावरण नियंत्रित करणारे मशिन चालू केले. मनःशांतीचे संगित लावले आणि मेंटल रिलॅक्सेशनच्या खास सोफ्यामध्ये शांतीची आराधना करत बसून राहिले..

19 comments:

yog said...

very nice story.. fantasy!
च्यामारीका tar ultimate...

शंतनू देव said...

Haha maja aali. Farach utkrusht.
Apratim
Pajistan ani chyamarika - ek number aahe.

मीनल said...

Yog, Shantanu,

chyamarika pajistanla dharun fatak marnar kadhirati.. :)

मनमौजी said...

च्यामारीका. . .एकदम धरून फट्याक!!!! लय भारी. . .चाबुक. .मस्त झाली आहे पोस्ट!!!

मीनल said...

मनमौजी,

धन्यवाद. दोघे एकमेकांना धरुन राहिले तर फट फट्याक होणारच!

Anonymous said...

एका पेक्षा एक शब्द शोधुन काढले आहेत. लवकरच चाउस च्या मराठी डिक्शनरीत ऍड होतील.

पोस्ट खूपच मजेशिर झालंय!! बरं झालं बझ केलं ते:)

मीनल said...

महेंद्रकाका,
ही राजकारणी लोकंच पुरवतात असले शब्द..
पोस्ट बझवरुन मिळाली का?
’ते’ पोस्ट का ’ती’ पोस्ट?

Ajay Sonawane said...

meenal ki minal,

mala post jhepali nahi hi, thodi dokyvarunch geliye :-)

मीनल said...

सरकारी कामकाजातले संदर्भ घेऊन अनेक वर्षांनी देखिल हेच काम कसे चालू असेल, याचे हे काल्पनिक संवाद आहेत. बाकी तोपर्यंत थोडा वेग वाढला असेल हे नक्की!

आणि हो, Meenal बरोबर आहे.

हेरंब said...

आधी बझलो होतो आता कमेंटतोय ..

हा हा हा मस्तच.. च्यामारीका आणि पाजीस्तान हे बेष्टेष्ट

मीनल said...

आधी बझलास पण नंतर कमेंटलास ते बरं झालं..
तू च्यामारीकेत असतोस नां? तुझ्या भावना वगैरे दुखावल्या नाहीत नां? :)

हेरंब said...

हो जाम दुखताहेत भावना. आता मी च्यामारिका आणि पाजीस्तान मिळून तुझ्या ब्लॉगवर केस करणार आहोत. निदर्शन करणार आहोत. ब्लॉग बंद पाडण्यासाठी. हा हा .

jokes apart. In fact अमेरिकेसाठी एवढा परफेक्ट शब्द मी आत्तापर्यंत ऐकला नव्हता. अभिनंदन..

मीनल said...

असं करु नका रे, तसाही हा अधेमधे डळमळीत अवस्थेत असतो..

शब्दासाठी ठांकू!

davbindu said...

लय भारी...आमालाबी ते च्यामारिका अन पाजीस्तान भावल...

मीनल said...

:)Davabundu ,
Thank you. Keep visiting..

अपर्णा said...

च्यामारीका आणि पाजीस्तान हे बेष्टेष्ट

मीनल said...

Thanks aparna.. (Dhumketu) :)

आनंद पत्रे said...

अरे कशी सुटली ही ग्रेट पोस्ट, एकदम भारी... नविन शब्दांबद्दल तर बोलायलाच नको... अप्रतिम

मीनल said...

हे हे आनंद, तुला पण धुमकेतू म्हणावं लागेल..
सगळ्या प्रतिक्रियांसाठी धन्यवाद!