Thursday, April 22, 2010

जंगलातली गोष्ट

एका मराठीब्लॉगविश्व नावाच्या जंगलात सगळे प्राणी सुखासमाधानाने रहात होते. आपापल्या पोस्ट पब्लिश करत होते, हिट काउंटर वाढवत होते. काही बरे वाचायला मिळाल्यास वाचक प्राणी लेखक प्राण्यांना प्रतिक्रियाही देत. काही आळशी प्राणी पोस्ट लिहण्यास टाळाटाळ करीत. तेव्हा त्यांचे इतर मित्र त्यांना प्रेमाने दमदाटीही करीत. सारे आनंदाने चालले होते. हे जंगल थोडे वेगळे होते. इथे सिंह हा राजा मानला जात नव्हता, उंदीर दुबळा मानला जात नव्हता. एक सत्ता नसून सारे जंगलराज्य लेखन गुणवत्तेवर चाले. एके दिवशी एका वाघाला दुसर्‍या वाघाची पोस्ट तिसर्‍याच्या पिशवित दिसली. त्याला नवल वाटले. दुसर्‍या वेळेला तर त्याला स्वतःचीच पोस्ट त्याच्या पिशवित दिसली. त्याबद्द्ल त्या प्राण्याला हटकले असता त्याने सरळ कानावर हात ठेवले. मग मात्र पहिल्या वाघाने ठरवले की याची शहानिशा करायची आणि त्याने स्वतंत्र ब्लॉग सुरु केला. बर्‍याच प्राण्यानी त्याला चांगला प्रतिसाद दिला. ’पोलिस वाघ’ म्हटले पण दुसर्‍या बाजूचे प्राणीही होते, त्यांचही काही म्हणण होत. आता काय करायचे? दुसर्‍या कमजोर गटात एक ’ जातीय फूट पाडा आणि हरवा ’ संकल्पनेवर विश्वास असणारा प्राणी होता. त्याने सरळ त्या ब्लॉगच्या प्रतिक्रियेमध्ये तू वाघ आहेस, तुझेच राज्य का असावे? तू स्वतःला कोण समजतोस? असली काही वाक्ये लिहली. खरं म्हणजे त्या जंगलाची एकच जात होती ती म्हणजे ’मराठी’. त्या एकात्मतेचा भंग केल्यामुळे वाघाला आणि इतर प्राण्यांना काही काळ वाईट वाटले. पण अशा फुसक्या वल्गनेला अजिबात दाद न देता, त्याने आपले काम सुरु ठेवले. सर्व प्राण्यांनी Kill by ignarance हा पर्याय अवलंबला आणि पुन्हा एकदा सर्वजण आपल्या पोस्ट सुखाने (स्वतःच्या नावाने) खरडू लागले.

तात्पर्य :-  बुध्दीमत्ता आणि प्रतिभा ही जात पाहून येत किंवा जात नाही. एक तर ती असते, किंवा नसते. म्हणून अशा गोष्टी उकरुन कोणी जंगलातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला तर सर्वांनी एकजूट होणे गरजेचे आहे.


संदर्भ-  http://www.harkatnay.com/2010/04/blog-post_18.html

15 comments:

आनंद पत्रे said...

अप्रतिम मीनल, कोणी जंगलातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला तर सर्वांनी एकजूट होणे गरजेचे आहे. एकदम सहमत....

मीनल said...

आनंद, मराठी ब्लॉगविश्वात हा प्रकार घडावा याची खंत वाटते.

sureshpethe said...

पण मागे ह्याच जंगलात एका गाढवाने वाघाचे कातडे पांघरून वाघ बनण्याचे ठरवले होते. त्याची काय गत झाली होती विसरलात का सारे?

आणखीन एकदा असे ठरलेले अहे ना की कुत्री भुंकलीत तरी हत्तीने आपल्या चालीने चालावे.

काहींना उसन्याचीच संवय असते कारण आडातच नसते तर पोहोऱ्यात यावे कुठून? मग ते इतरांनी टाकलेल्या चुळा पोहोऱ्यात जमा करून दाखवत हिंडत असतात !

मीनल said...

पेठेकाका,

तुम्ही नक्की कुठल्या गाढवाबद्द्ल बोलत आहात? लक्षात आले नाही. :) असो.
उसनवारीविषयी वाद पुन्हा उकरुन काढायचा इरादा नव्हता. त्याबद्दल हेरंबने सविस्तर लिहलेलंच आहे. पण त्याला प्रतिक्रिया म्हणून इथेही जातपात आणल्याबद्दल निषेध नोंदवला इतकेच!

Vivek said...

मीनल

cool post!

मी तुझा ब्लॉग follow करायला सुरुवात केलीय.

विवेक.

मीनल said...

हो.. पाहीलं मी.. आता पावशेर फॉलोअर झाले.(२५)
धन्यवाद.

Anonymous said...

तो गाढव कोण ते माहिती नाही??

Anonymous said...

तो गाढव कोण ते माहिती नाही??

भानस said...

मीनल, सहमत आहे. जे वारंवार घडतेय त्याची खंत वाटते.

सिद्धार्थ said...

खरचं दुर्लक्ष करणे हाच एक चांगला उपाय आहे. नाहीतर आपल्याच डोक्याला कटकट होते.

हेरंब said...

झक्कास लिहिलं आहेस. त्यांची उलटसुलट विधानं ऐकल्यावर जेवढा झाला नसेल त्याच्या कैक पट जास्त संताप त्याच्या मित्राने तो प्रकार जातीपातीवर नेल्यावर माझा झाला. !!!

अपर्णा said...

मीनल...मराठी ब्लॉगविश्ववर बरंच काही घडतंय आणि त्यातलं अशा नकोश्या गोष्टींबद्द्ल खरंच आश्चर्य वाटतंय...
मला तसंही काही चोरीला जायचं भ्या नाही कारण साहित्यिक कॅटेगरीमधलं म्या काय लिवत न्हाय..पर तरीबी स्वान्त सुखाय हेच बरं असं माझिया मनाचं म्हणणं आहे....

मीनल said...

महेंद्रकाका,
हा.. समजले.

भाग्यश्रीताई,
होय,वारंवार घडतेय ते चांगले नाही.

सिध्दार्थ,
दुर्लक्ष करायला चांगले, पण एकदा निषेधही नोंदवायला हवा होता.

हेरंब,
या पोस्टचा मुख्य रोख हा प्रकार जातीपातीवर नेल्यावरच आहे. दुसरा कुठला मुद्दा मिळाला नाही की जात काढायची हे बरोबर नाहीच!

अपर्णा,
खरं आहे तुझ या नकोशा गोष्टी जाऊदेत..
आणि मलाही साहित्यिक चोरीच भय नाहीये बरं का.. :)

Ajay Sonawane said...

हे सगळं कशाबद्दल लिहलं गेलंय ते काही मला समजलं नाही, कदाचित बरेच दिवस ब्लॉगींग करत नसल्यामुळे मी बहुतेक बरयाच गोष्टी मिस केल्या आहेत.

मीनल said...

पोस्ट्च्या शेवटी दिलेली हेरंबची लिंक पहा.