वेगळेपणाबद्दल गुलजारनेच म्हटले आहे की, लोकं म्हणतात तुम्ही नविन शब्द कुठून शोधून काढता हो? ’नीट पहा, शब्द नविन नाहीत तेच आहेत, फक्त जागा बदलल्यात! आँखे, खुशबू हे शब्द नविन नाहीत. पण आँखोंसे महकती खुशबू म्हटले की लोकांना वाटते, हे काय नविन आणि?’
कविता ही आवडण्याच बंधन असलेली गोष्टच नाही. एक तर ती आवडते किंवा नाही आवडत! पुढे त्याचे ’कळली नाही म्हणून आवडली नाही, छंदबध्द नाही म्हणून आवडली नाही ’ असे पोटभाग पडत जातात, पण ती पुढची गोष्ट आहे. पुखराज़ मधे काही नविन आढळेल, कुणाला तसं आढळणारही नाही कदाचित! पण काही रचना दृष्ट लागण्याइतक्या सुंदर आहेत हे नक्की! पुखराजची सुरवात अमृता प्रितमच्या प्रस्तावनेने होते. या संग्रहाबद्दल गुलजार म्हणतो,
इक सबब मरने का, इक तलब जीने की
चाँद पुखराज का, रात पशमीने की
एकटेपणा वागवणार्या कविता चंद्रावर केलेल्या कवितांइतक्याच भरपूर आहेत..जसे की दोस्त, खामोशी़, पतझड.. फाळणीच्या जखमाही दिसतात कुठे कुठे, अतिरंजित वाटणारं सत्यही सापडत कुठे!
दिवसभर बाहेरच असतो मी, कामासाठी किंवा दिवस घालवण्यासाठी केलेल्या कामासाठी. तसही घरी कुणी असणासच नाही पण सवयीने रिकाम्या घरी येतो तर, हे काय आश्चर्य, इथे माझ्याही स्वागतासाठी कुणीतरी आहे!
दोस्त
बे यारो मददगार ही काटा था सारा दिन
कुछ खुद से अजनबी सा, कुछ तन्हा उदास सा
साहिल पे दिन बुझा के मैं लौट आया फ़िर वही
सुनसान सी सड़क के इस खा़ली मकान में
दरवाजा खोलते ही मेज पर किताब ने
हल्के से फड़फडा़ के कहा-
"देर कर दी दोस्त ।"
-----------------------------
’नसतेस घरीची’ किंचीतशी आठवण होते.
खा़मोशी
खिडकियाँ बंद है दिवारों के सीने ठंडे
पीठ फेरे हुए दरवाजों के चेहरे चुप है
मेज-कुर्सी है कि खा़मोशी के धब्बे जैसे
फ़र्श में दफ़न है सब आहटे सारे दिन की
सारे महौल पे ताले-से पडे़ हैं चुप के
तेरी आवाज की इक बूँद जो मिल जाये कही
आख़री साँसों पे है रात ते बच जायेगी-------------------------------
पुरणाशिवाय पुरणाच्या पोळ्या, चंद्राशिवाय गुलजारचे पुस्तक कसे शक्य आहे?
पतझड़
जब जब पतझड़ में पेडों से पीले पीले पत्ते
मेरे लॉन में आकर गिरते है
रात को छत पर जाके मैं आकाश को तकता रहता हूँलगता है कमज़ोर सा पीला चाँद भी शायद
पीपल के सूखे पत्ते सा
लहराता-लहराता मेरे लॉन में आकर उतरेगा
--------------------------------
गुलजारबद्दल तो कमी, बाकीचेच लोक जास्त बोलतात ही फॅक्ट आहे. त्याला ते आवडत असेल, नसेल.. पण सेल्फ पोर्टरेट मधे त्याने आपल्या नावाच्या प्रवासाबद्दल लिहले आहे. हे त्याचे स्वगत आहे.(असावे) ’तुमने इक मोड़ पर अचानक जब मुझको ’गुलज़ार’ कहके आवाज़ दी’ मधला ’तुम’ कोण आहे नक्की? जर तो स्वतःशीच बोलतोय तर ’मेरे दिलने कहा’ टाइपचे वाक्य का नाही?
गुलजारच्या चार चार कविता असताना आपण जास्त न लिहलेलेच बरे!
सेल्फ पोर्टरेट
नाम सोचा ही ना था, है कि नहीं
’अमाँ’ कहके बुला लिया इक ने
’ए जी’ कहके बुलाया दुजे ने
’अबे ओ’ यार कोग कहते है
जो भी वूँ जिस किसी के जी आया
उसने वैसे ही बस पुकार लिया
तुमने इक मोड़ पर अचानक जब
मुझको ’गुलज़ार’ कहके दी आवाज़
एक सीपी से खुल गया मोती
मुझको इक मानी मिल गये जैसे
आह, यह नाम खूबसूरत है
फिर मुझे नाम से बुलाओ तो !
---------------------------------




14 comments:
क्या बात है.
गुलझारच्या कविते एवढाच खुबसुरत लेख
धन्यवाद स्वानंद!
धन्यवाद हरेकॄष्णजी,
यापरि बहुमान कोणता?
मीनल, सहीच. दिल की तार छेड दी... :)
सहजच काही शब्द आठवले...
एक और रात...
चुपचाप दबे पांव चली जाती है
रात खामोश है, रोती नहीं, हंसती भी नहीं
कांच का नीला-सा गुंबद है, उड़ा जाता है
खाली खाली कोई बजरा-सा बहा जाता है
चांद की किरनों में वो रोज-सा रेशन भी नहीं
चांद की चिकनी डली है कि घुली जाती है
और सन्नाटों की इक धूल उड़ी जाती है
काश इक बार कभी नींद से उठकर तुम भी
हिज्र की रातों में ये देखो तो क्या होता
****
ये देखो तो क्या होता है
व्वा! हि कविता पण होती शॉर्ट लिस्ट मधे, पण ’रुपा पब्लिकेशनवाले’ माझ्यावर नक्की केस करणार या भितीने टाइप केली नाही.. :)
काश इक बार कभी नींद से उठकर तुम भी
हिज्र की रातों में ये देखो तो क्या होता..
जो रात हमने गुजारी मरके
वो रात तुमने गुजारी होती
ची आठवण होते..
पुढच्या त्रिवेणीच्या भागातही तुझ्या काही आवडत्या त्रिवेणी होऊन जाउ देत!
अगदी आता-आताचं बिल्लू मधलं गाणं, त्यात काय लिहिलंय त्यांनी - तारा चमकीला होगा, चॉंद शरमिला होगा, नथ में लगा लेना.. गुलजारचे शब्द म्हणजे मोरपिस.
स्वागत कांचनताई,
खरयं.. गुलजारचे शब्द म्हणजे मोरपिस!
त्यांची काही गीतं तर अप्रतिम आहेत.
पोस्ट मस्त झाली आहे अन् गुलजार विषयी मी पामर काय बोलणार???
काय अफलातून लिहतात!!!
कस सुचत देव जाणो!!
धन्स योगेश,
गुलजारच्या कविता कधी झटक्यात समजतात, कधी पारायणं करावी लागतात.
आणि प्रत्येक कवितेत कुठला शब्द कशाच्या संदर्भात वापरला आहे याची उत्सुकता लागून राहते.
sundar !
Thank you Ajay!
अभिनंदन मीनल!
येउ दे असंच...आता पुढच्या वाढदिवसाला २५ च्या २५० होऊ देत!
टेम्प्लेटच्या घोळात..चुकीच्या ठिकाणी कॉमेंट केली मी...क्षमा कर..इथून उडवून टाक!
Post a Comment