
मब्लॉवि इथे नविन मित्र मैत्रिणी मिळाले. कौतुकाच्या चार शब्दांनी उत्साह दहा पटींनी वाढला. (जो महिन्याला तीन पोस्टच्या वर कधी गेला नाही) त्यांनी कुठल्याच पोस्टला एकटे टाकले नाही. एखाद-दुसरी का होईना, पण प्रतिक्रियेची सोबत खूप सुखावून गेली. अपर्णा म्हणते त्याप्रमाणे काही धूमकेतूंनी अनपेक्षितरित्या एकदम भरपूर कमेंट देवून सुखद धक्का दिला. कधी कानपिचक्या मिळाल्या, सूचना मिळाल्या. त्यातूनच खर्या अर्थाने नोंद घेतली गेल्याचे जाणवले. मध्यंतरीच्या टॅगिंग प्रकारामुळे बरेच नविन ब्लॉग कळाले, गजाली वरही नविन लोकं हजेरी लावून गेले.
ब्लॉग हा माणसाचा छापिल चेहराच म्हणायला हवा. तो कधी हसतो, रागावतो, मधेच सुस्त होतो, बरेचदा नॉस्टॅलजिक होतो. ’कं’च्या काळात दोघा तिघांनी ’उठा, छापा काहीतरी’ म्हणून पाठवलेले इमेल मैत्रिणीच्या कोपरखळीसारखे हसू उमटवून गेले. प्रोत्साहनासाठी सर्वांचे खूप आभार.
अलिशान सप्ततारांकित रेस्टॉरेंट असो वा कोपर्यापरची छोटी टपरी! सुरु करणार्याच्या मनात थोडी धाकधूक असतेच. हिच गोष्ट छेडताना गुलजारने ’रात पश्मीने की’ या पुस्तकाच्या सुरवातीला म्हटले आहे,
’ उम्मीद भी है घबराहट भी कि अब लोग क्या कहेंगे, और इससे बड़ा डर यह है कि कहीं ऐसा न हो कि लोग कुछ भी न कहें ’
नेमके हेच या ब्लॉग बद्दलही वाटत होते. तसेही ब्लॉगस्पॉटवरचा एक दुवा अडवून मी फार काय कामगिरी करणार हा प्रश्नही होताच. तरी, या छॊट्याश्या टपरीवर काहीबाही खरडलेले तुम्ही गोड मानून घेतलेत. टपरीच्या कटींग चहाला काही जणांनी त्यांच्या ब्लॉगवर जागा दिली.(विजेटबद्दल भुंगादादाचे आभार) गजालीच्या पहिल्या वाढदिवसाचा केक शोधताना मलाही मजा आली. असेच भेटत राहू. लोभ असावा.



33 comments:
मीनल...अभिनंदन!!!!
पुढील लिखाणास मनापासून शुभेच्छा!!!!
केक फक्त फोटूत नको आहे.
अभिनंदन ! :)
तुमचं लिखाण आवडतं.
नवीन थीम पण छान आहे.
तुमच्या ’गजाली’च्या पहिल्या वाढदिवसाबद्दल मनापासुन अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा....
हया लेखात तुम्ही लिहलेल थोड्या फ़ार फ़रकाने जवळजवळ सगळ्याच ब्लॉगर्सनी अनुभवल आहे हयाबाबत शंका नाही...
अभिनंदन मीनल..लिहते रहा
खूप खूप शुभेच्छा... :)
ठांकू योगेश,
केकसाठी कोल्हापूरच्या कैक खड्यातून (इथे क सायलेंट आहे) कसरत करत यावे लागेल.. :)
धन्यवाद दवबिंदू,
खरं आहे तुमचं.. थोड्या फ़ार फ़रकाने सर्वांच्या अशा प्रकारच्याच भावना असाव्यात!
धन्यवाद शार्दुल,
वाढदिवसाला नविन ड्रेस नको का?
म्हणून टेंप्लेट बदललं.
ठांकू सुहास,
भेट देत रहा.. :)
मस्त! तुझा ब्लॉग आणि लिखाण सुंदर आहेच.. अशीच लिहित रहा... अभिनंदन
धन्यवाद आनंद,
प्रोत्साहनाचे शब्द खूप मोलाचे आहेत.
खूप छान लिहिल आहे. आपल्या पुढिल वाटचालीला षुभेच्छा.
धन्यवाद केदार!
Abhinandan ani Shubhechha.
मीनल, ब्लॉगला वादिहाहाशु आणि अभि आणि नंदन :) ..
छान लिहिलं आहेस आणि लिहितेसही. फ्रिक्वन्सी अजून वाढवता आली तर बघ..
Happy Birthday To You!
nice celebration .....
शितल धन्यवाद
खूखूआ हेरंब..
सूचनेबद्दल धन्स. फ्रिक्वन्सी कमी आहेच.
वाढवण्याचा प्रयत्न करेन.
ठांकू योगेश,
हे आपले असेच, नेट सेलिब्रेशन!
मीनल, खूप खूप अभिनंदन व ढेर सा~या शुभेच्छा! नवीन कपडे मस्तच. आणि केकही. :)
khup sarya shubhechca ! asach navin navin likhan chalu thev :-)
kahi khochak comments kade durlaksh pan karat jaa :-)
ब्लॉगच्या प्रथम वर्षाच्या शुभेच्छा
धन्यवाद श्रीताई,
नविन कपडे आवडले नां? त्यासाठी भरपूर कर्सरपीट केली आहे :)
Thank you Ajay,
हो, लक्षात ठेवेन.. :)
धन्यवाद स्वानंद..
मीनल, पहिल्यांदी खूप खूप शुभेच्छा....आणि ते धुमकेतूचं इतकं आवर्जुन लक्षात ठेवलंस की स्वतःच धुमकेतू झालीयस?? :) BTW....माझ्या ब्लॉगच्या पुढच्या वाढदिवसाला तुझी ही पोस्ट थोडी फ़ेरफ़ार करुन ढापावी म्हणतेय...:)
चला आता लगेच पुढच्या पोस्टने अजुन एक कटिंग होऊन जाऊदे.
विद्याधर,
गल्ली चुकलास तरी भावना पोहोचल्या.. :)
खूप खूप धन्यवाद!
अपर्णा,
धन्स,धूमकेतूचं पक्क लक्षात राहिलं आहे. या ब्लॉगचे धूमकेतू म्हणजे सोनाली आणि आनंद.
पोस्ट ढापायला (फक्त तुला)फुल्ल परवानगी :)
मीनल.. अभिनंदन.. तुमच्या ब्लोगचा आता पाठलाग करतोय तेंव्हा भेटणे होईलच... :)
मी सुद्धा माझ्या सर्व ब्लोग्सना पहिल्या वाढदिवसाला नवीन कपडे केले होते... :) अख्खे २ दिवस नेसवा-नेसवी सुरु होती... :D
रोहन,
पाठलागाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल डबल धन्यवाद!
२ दिवस नेसवा-नेसवी सुरु होती.. :)
barech diwsani Marathi wachun khup khup bara watla Aapan khup changla lihita, keep it up..
Thank you Zahir.
मीनल अभिनंदन गं!!!
(उशिरा करतेय ना फार पण वरातीमागूनच घोडे असते माझे किंवा या असल्या म्हणी माझ्यासारख्या लोकांना पाहूनच निर्माण झाल्या असाव्या कदाचित असे म्हण... असो भावना महत्वाची :))
तूझ्या ब्लॉगच्या बाबतीत नेहेमी असे होते की एक पोस्ट वाचली जाते आणि लक्षात येते की गेल्या १/२ पोस्ट वाचायच्या राहिल्यात मग मी ठरवते की सगळ्या वाचून कमेंट टाकूया.... पण कं असा काही सोबत करतो की काय सांगू...
असो...
पुढील लिखाणास मनापासून शुभेच्छा!!!!
मीनल अभिनंदन गं!!!
(उशिरा करतेय ना फार पण वरातीमागूनच घोडे असते माझे किंवा या असल्या म्हणी माझ्यासारख्या लोकांना पाहूनच निर्माण झाल्या असाव्या कदाचित असे म्हण... असो भावना महत्वाची :))
तूझ्या ब्लॉगच्या बाबतीत नेहेमी असे होते की एक पोस्ट वाचली जाते आणि लक्षात येते की गेल्या १/२ पोस्ट वाचायच्या राहिल्यात मग मी ठरवते की सगळ्या वाचून कमेंट टाकूया.... पण कं असा काही सोबत करतो की काय सांगू...
असो...
पुढील लिखाणास मनापासून शुभेच्छा!!!!
धन्यवाद तन्वीताई!
अगं भावनाच महत्वाची..
कंचा पिच्छा सुटत नाही, माझेही बरेचदा असेच होते.. त्यामुळे भापो.. :)
Post a Comment