Saturday, November 20, 2010

अंजिर फिरनी

अंजिर फिरनी

साहित्य:-

दूध-१ लिटर,
बासमती तांदूळ- ४ चमचे,
साखर- ५ चमचे,
अंजिर- १
काजू- १०,१२
पिस्ता, बदाम- ८,१०
वेलदोडे- ३

(चमचा-मोठा टे.स्पून)


कॄती-

प्रथम तांदूळ धुवून अर्धा तास पाण्यात भिजवावे. नंतर खरबरीत वाटून घेऊन अर्धा वाटी पाणी घालून ठेवावे.
अंजिर बारीक तुकडे करुन अर्धा वाटी दूधाबरोबर मिक्सर मधून काढावे. त्याची थोडी पेस्ट होईल, थोडे तुकडे तसेच राहतील. हे वाटीभर मिश्रण तसेच बाजूला ठेवावे.
काजू, पिस्ता, बदाम चिरुन ठेवावे. साधारण अर्धा चमचा पूड होईल इतके वेलदोडे कुटून ठेवावे.
शक्यतो नॉनस्टीक भांड्यात दुध तापत ठेवावे. त्याला उकळी आल्यानंतर तांदूळ दूधात घालावेत. नंतर साखर, वेलची पावडर घालावी. ती विरघळल्यावर काजू, बदाम, पिस्ते घालावेत. मंद आचेवर मिश्रण सतत ढवळावे. सर्वात शेवटी अंजिर पेस्ट घालावी. ५ मिनिटे किंवा साधारण दाट होत आले की गॅस बंद करावा. फिरनी थंड होत आली की आणखी थोडी आळते. अशी दाट खीर वरुन थोडे काजू घालून वाढावी.टीप-
अंजिर ऎवजी स्ट्रॉबेरी किंवा दूधाबरोबर सूट होणारी इतर फळे घालूनही छान लागते. स्ट्रॉबेरी वापरताना बारीक तुकडेच करावेत. मिक्सरमधून काढू नये.
साखरेचे प्रमाण इथे कमी घेतले आहे कारण अंजिराचाही गोडवा त्यात अधिक होतो. फळानुसार साखर कमी जास्त करावी.

15 comments:

सुहास झेले said...

फिरनी माझी आवडती डिश :)
ईद असताना इम्रानची आई हक्काने एक डब्बा भरून पाठवते..ही रिसेपीपण देतो त्यांना..लवकरच खाउन सांगेन परत :)

मोगरा फुलला said...

सही रेसिपी दिलीस गं. धन्यवाद. सोपी आहे. करून पाहीन.

मीनल said...

सुहास,
हो,रे ईद स्पेशल डिश आहे. ड्रायफ्रूट्स जास्त घालून आणखी छान लागते. :)
खाऊन सांग कशी झाली ते!

मीनल said...

कांचनताई,
माझी पहिली खादाडी पोस्ट.. म्हणून गोड पदार्थ! :)
नक्की ट्राय करुन पहा..

मनमौजी said...

रेसिपी सोबत डिश पाठवली असती बर झाल असत..टेस्ट करुन सांगितल असत.

मीनल said...

हाहा..
नक्कीच! पत्ता इमेल करावा. कुरिअर करण्यात येईल.. :)

THE PROPHET said...

खादाडी पोस्टची सुरूवात इतक्या डेडली डिशने करू नये...
मला असं काहीतरी मिळण्यासाठी अजून तीन आठवडे वाट पाहायचीय..
असो...मी फोटोकडे न पाहता पोस्ट वाचलीय..
(नवीन टेम्प्लेट छान आहे!)

मीनल said...

विद्याधर,
गोड आणि नविन हेच येत होतं..
तू फोटोकडे पाहिल्याशिवाय डिशचा अंदाज येणार नाही(आणि आम्हालाही टुकटुक करता येणार नाही)

टेंप्लेट जुनेच आहे. आधिच्या टेंप्लेटमधे पब्लिक भलत्याच गल्लीत शिरु लागलं.. म्हणून हेच परत बदललं. :)

आनंद पत्रे said...

बेश्ट.. आम्हाला याचा उपेग आहे.... साहित्य तयार ठेवतो आमच्या कडं शिकवणी देणे ;)

अपर्णा said...

Minal.......You too..............

एकदम खतरू फोटो आहे....मी आळशी आहे मला आयती हवी...रेसिपी नसली तरी चालेल....

मीनल said...

आनंद,
साहित्य तयार असलं, की वेळ लागत नाही, पण तुला आता शिकवणीची काय गरज? तुम्हाला काय बाब्बा आता रोज नविन नविन पदार्थ मिळतील..

मीनल said...

अपर्णा,
थॅक्स गं..पहिल्यांदाच केली होती मी पण ;) तांदळाच्या खिरीचे थोडे मॉडिफिकेशन! तू कधीही ये, इथे आयती मिळेल.. :)

सचिन उथळे-पाटील said...

मस्त पदार्थ आहे.
करायला सांगतो.

नेटवरून सर्वे खादाडी जमा करून ठेवतोय :).

मीनल said...

सचिन,
कुणाला करायला सांगणार? ;)
>नेटवरून सर्व खादाडी जमा करून ठेवतोय.
म्हणजे नंतर कुणालातरी रोज फरमाईश करुन कामाला लावणार तर! :)
थॅक्स रे!

अपर्णा said...

सचिन एक चकटफ़ु सल्ला देते....खरं तर एखादी डिश नेटवरुन शिकुन तूच तिला सरप्राइज कर...माझी ती पोस्ट वाचलीस नं?? बायकोला मोठ्या गिफ़्टांपेक्षा असे सरप्राइजेस जास्त भावतात ....