Wednesday, December 15, 2010

पोंगल

गोड पोंगल


साहित्य:-

 तांदूळ- १ वाटी,

 मूगडाळ- १/२ वाटी,

 गूळ- १ वाटी,

 दूध- ३ वाट्या,

 लवंग- ३,

 वेलदोडे- ४,

 काजू- १०-१२,

 बेदाणे- १०-१२

 तूप- ३ चमचे,

 ताजं खोबरं- भरपूर

कॄती-

  • प्रथम एक वाटी तांदूळ धुवून पूर्ण न निथळता किंचित पाण्यात एक तास पाण्यात भिजवावे. मूगडाळ एक चमचा तुपात लालसर भाजून घ्यावी. भाजतानाच त्यात लवंगा टाकाव्यात. नंतर डाळही धुवून पूर्ण निथळून एक तास भिजत ठेवावी. गूळ बारीक चिरुन ठेवावा. 
  • जाड पातेल्यात ३ वाट्या दूध, एक वाटी पाण्याबरोबर गरम करावे. उकळी आल्यावर त्यात तांदूळ व डाळ घालावी.
  • कमी आचेवर दूध पातेल्याला लागू न देता अधूनमधून ढवळत रहावे. (१० मि.)
  • आता एक वाटी गूळ घालावा.(जास्त गोडीसाठी दिड वाटी) गूळ विरघळून डाळ तांदूळ एकत्र झाल्यावर दोन चमचे तूप घालावे. नंतर काजू, बेदाणे, वेलदोडे, आणि दोन वाट्या खोबरं घालून मिसळावे.
  • एक वाफ आल्यावर परत थोडे खोबरे आणि १ चमचा तूप शिजलेल्या पोंगलमधे घालावे.
  • खोबरे जास्त घातले तरी छान लागते. अधिक नारळाचे दूधही वापरतात.


13 comments:

THE PROPHET said...

कसलं भारी!!!
मला फार आवडतो हा प्रकार! :)
मी पॅरिसमध्ये खाल्ला होता हा भात!
:D:D
मस्त जमलेला दिसतोय फोटोवरून...

सचिन उथळे-पाटील said...

मस्त. आपल्या आवडीचा आहे हा प्रकार.
ममी अहमदाबाद मध्ये खाल्ला होता हा.

Maithili said...

Yummmy... :-)

Yogesh said...

मस्त...मस्त..मस्त..

मीनल said...

विद्याधर,
पॅरिसचं पोंगल!! भारी आहे :P
बरा झाला असावा.. दुसर्‍या दिवशी कामवालीला नाही द्यावा लागला!

मीनल said...

सचिन,
आणि एक पदार्थ अ‍ॅड केलास का लिस्टात?
थॅक्स रे!

मीनल said...

मैथिली,
आवड्या नं? तू आणि मी गोडवाली माणसं.. :D

मीनल said...

धन्यवाद योगेश. :)

माऊ said...

वा वा....येत म्हणजे मुलीला जेवण बनवता...:P..मी पण करुन बघेन...नाहीतर तु आहेच...

मीनल said...

माऊताई,
जेवण नाही, असलं बाकीचच बनवता येतं.. :)
करुन बघ, नाहीतर ये कोल्हापूरला..

भानस said...

मीनल, मलाही हा पोंगल प्रकार फार आवडतो. शिकागोच्या देवळात गेलो की खाल्ल्याशिवाय देव मुळी सोडतच नाही. :D

आनंद पत्रे said...

ही पोस्ट योग्य व्यक्तींपर्यंत पोचवण्यात येईल ;)

अपर्णा said...

मीनल यु टू.........ओह नो....काय गं शिल्लक राहिलाय का माझ्यासाठी थोडा?? नसेल तर बनव परत मी काही बनवणार नाही स्वतः...जा...
ढि षे ण.......